सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

वेचलेलं...

माणसाला पडणारे प्रश्न त्यालाही अनेकदा सतावत असावेत. पण, त्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधणा0याला त्याच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय शांतही राहता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा असे प्रश्न पडत असतात. मात्र, आपल्यापैकी प्रत्येकजण ज्ञानी असत नाही. कारण, प्रश्नाचे उत्तर शोधून बुद्धासारखं निरामय हास्य चेहºयावर येण्याइतके आपण योगी नसतो. पण, आपल्यापैकी प्रत्येकजण सतत काहीतरी शोधत असतो...दैनंदिन व्यापातून काही आनंदाचे क्षण...काही विचार...कधी चांगले चित्र...कधी चित्रपट...कधी मित्रांच्या भेटीतून...कधी ऐकण्यातून...वाचण्यातून...अनुभवातून असे अनेक  क्षण सहजपणे वेचले जातात. म्हणूनच...आमच्या आयुष्यातील काही वेचलेलं जर आपल्यालाही आनंद देऊन जाणार असेल तर...का? लिहू नये हा ब्लॉग...सर्वांसाठी वेचलेलं.....